भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांची जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक भैय्या गंधे यांनी घेतली सदिच्छा भेट.
नगर,प्रतिनिधी. (03.जानेवारी.) : भारतीय जनती पार्टीचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व महाराष्ट्र प्रदेशाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक भैय्या गंधे यांनी औरंगाबाद येथे सदिच्छा भेट घेतली.भेटीत गंधे यांनी नगर शहरात होणाऱ्या विकास कामांबाबत सविस्तर माहिती दिली, ते ऐकून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांनी गंधे यांचे कौतुक केले.