जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कठोर भूमिका.

Ahmednagar Breaking News
0

जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ११४ जणांवर पोलिसांची कारवाई.

नगर,प्रतिनिधी : वाढत्या जातीय तणावांच्या घटना पाहता नगर शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. शनिवार पर्यंत नगर शहरातील अशा ११४ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.तसेच 'टूप्लस’चा आधार घेऊन शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांवर अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

          मकर संक्रांतीच्या दिवशी मंगलगेट परिसरातील जे.जे.गल्लीत दोन गटांमध्ये वाद होऊन दगडफेकीची घटना घडली.यानंतर नगर कॉलेजमध्ये किरकोळ कारणातून दोन गट पुन्हा समोरासमोर आले. अशा एक ना अनेक छोट्या-मोठ्या घटना नगर शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. शहरातील तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. तीन सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना जिल्ह्यातून हद्दपार केले जाणार आहे. त्यांचा हद्दपारीचा प्रस्ताप पोलिसांकडून तयार केला जात आहे. तसेच भादंवि कलम १०९ नुसार दोन तर भादंवि कलम ११० नुसार २८ व्यक्तींकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत.दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या ८१ व्यक्तींना भादंवि कलम १४९ नुसार नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्या हालचालीवर पोलिसांची नजर असणार आहे.आतापर्यंत ११४ गुन्हेगारांवर ही कारवाई केली असली तरी यापुढेही अनेकांवर अशा कारवाई केल्या जाणार आहेत, असे अधीक्षक खैरे यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top