भव्य मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर.
नगर प्रतिनिधी.(07. जानेवारी.) : आर्ट ऑफ लिव्हिंग आणि मंगलमूर्ती क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरातील सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. नाव नोंदणी मंगलमूर्ती क्लिनिक, शिवाजीनगर,नगर कल्याण रोड,अहमदनगर या ठिकाणी करावी. मोबाईल नंबर.9579700787/7276588370/8087188448.