श्री.गजानन महाराज मंदिरासाठी झावरे कुटुंबाकडून ग्रॅनाईटची भेट.

Ahmednagar Breaking News
0

श्री.गजानन महाराज मंदिरासाठी झावरे कुटुंबाकडून ग्रॅनाईटची भेट.

नगर,प्रतिनिधी.(24.जानेवारी.) : गुलमोहर रोड नवलेनगर मधील श्री गजानन महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी श्रीमती सत्यभामा झावरे यांच्या परिवाराकडून ग्रॅनाईटची भेट देण्यात आली. मंदिराच्या समोरील चारही बाजूंनी ग्रॅनाईट लावण्यात येणार आहे. झावरे कुटुंब हे अगोदर पासूनच श्री गजानन महाराजांचे भक्त आहेत. त्यांनी नवले नगर परिसरात मंदिराच्या आवारात घर घेतले त्याचवेळी त्यांनी मंदिरातील नागरिकांना विचारपूस करून ह्या मंदिराचे काही काम बाकी आहेत का? असेल तर आम्ही त्यासाठी मदत करू इच्छितो असे सांगितले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी आज मंदिरासाठी ग्रॅनाईटची मदत केली आहे.अशोक ढगे यांनी मंदिरासाठी दानपेटी तयार करून दिली आहे. मंदिरासाठी कायमच परिसरातील नागरिक स्वइच्छेने मदत करत असतात.

यावेळी नगरसेवक रामदास आंधळे,सत्यभामा झावरे,ऋषिकेश झावरे, योगेश झावरे,मनीषा झावरे,कुमार नवले,आदिनाथ म्हस्के, विनोद भिंगारे, योगेश खरमाळे, विलास निरवले सर, विनायक शुक्रे,अनिल सोले,पोपटराव जामगावकर,रमेश श्रोत्रिय,शेखर शिंदे,जयंत रेखी,देविदास म्हस्के,प्रसाद जोगदंड, अशोक पालवे,अशोक ढगे आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी नगरसेवक रामदास आंधळे यांनी मंदिर परिसरात झालेल्या विकास कामांची माहिती देऊन अजून काही गरज असल्यास मला त्याबाबत नागरिकांनी आग्रहाने सांगावे असे सांगितले. कुमार नवले यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top