शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात पुष्पवृष्टीत गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Ahmednagar Breaking News
0

शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात पुष्पवृष्टीत गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

नगर, प्रतिनिधी. (25. जानेवारी.) : श्री गणेश जयंतीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे श्री गणेश जन्मावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उद्योजक प्रकाश मुनोत, महेश मुनोत व गणेश पालवे परिवाराच्यावतीने महापुजा करुन आरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, बापूसाहेब एकाडे, हरिभाऊ फुलसौंदर, रंगनाथ फुलसौंदर, ज्ञानेश्वर रासकर, पांडूरंग नन्नवरे, गजानन ससाणे, हरिश्चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, संजय चाफे, प्रा.माणिक विधाते, नितीन पुंड आदिंसह पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते.

प्रारंभी सकाळी अभिषेक करण्यात आला. भाविकांनी पहाटे पासून रांगा लावल्या होत्या. दुपारी गणेश जन्मवेळी भाविकांनी पुष्पसृष्टी केली. यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. गणेश जयंतीनिमित्त मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांसाठी मंडप, बॅरिगेटस्, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मंदिरातील सेवेकरी व पोलिस प्रशासन भाविकांची गर्दीेचे नियोजन करत होते.

 यावेळी देवस्थानच्यावतीने मुनोत परिवार व पालवे परिवार यांचा श्री विशाल गणेशाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी छाया मुनोत, मोहित मुनोत, प्रज्ञा मुनोत, कमल पालवे, शिवम पालवे, योगिता पालवे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top