लग्न समारंभातून कॅमेरा व व्हिडिओग्राफीचे सामान चोरणारा सराईत गुन्हेगार तालुका पोलिसांनी केला जेरबंद.

Ahmednagar Breaking News
0

लग्न समारंभातून कॅमेरा व व्हिडिओग्राफीचे सामान चोरणारा सराईत गुन्हेगार तालुका पोलिसांनी केला जेरबंद.

नगर,प्रतिनिधी.(27. जानेवारी.) : लग्न समारंभातून पत्रकाराचा कॅमेरा व व्हिडीओग्राफीचे सामान चोरणारा सराईत गुन्हेगार पुणे येथून नगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून २ लाख ८९ हजार किंमतीचा कॅमेरा,लेन्स, अडॅपटर,फिल्टर इत्यादी साहित्य जप्त केले आहे.नगर तालुका पो.स्टे. गुरनं.१६/२०२३ भादविक ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी सोहेल मुस्ताफा मनियार (रा.चिंचोडी पाटील ता.जि.अहमदनगर) यांनी भातोडी गावातून दि. ०२/१/२०२३ रोजी लग्न समारंभ सुरु असताना कॅमेरा, लेन्स व अडॅपटर असा २ लाख ८९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला असलेबाबत नगर तालुका पोलीस ठाणेस तक्रार दिलेली होती.दि.२६/०१/२०२३ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत सपोनि राजेंद्र सानप यांना सदरची चोरी ही संदीप धर्मा पवार (रा.भोसरी जि.पुणे) याने केली असल्याची व तो भोसरी येथे आला असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार एक पथक पुणे येथे काल दिनांक २६/१/२०२३ रोजी पुणे येथे पाठविण्यात आले होते.स्थानिक भोसरी पोलीसांचे मदतीने आरोपीस ताब्यात घेवून नगर तालुका पोलीसांनी आरोपीकडून खालील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत केला.


१) १,१८,०००:०० रुपये किंमतीचा एक कॅनान कंपनीचा कॅमेरा

२) १,६५,००००० रुपये किंमतीच्या कॅमेऱ्याच्या लेन्स

३)४५००:०० रुपये किंमतीचा कॅमेरा अडॅपटर ४) १५०००० रुपये किंमतीचे कॅमेरा फिल्टर

२,८९,००० रुपये वरील किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर वरील आरोपीवर पुणे जिल्हयामधे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१)भोसरी MIDC पोलीस स्टेशन जिल्हा पुणे गु.र.नं. ४८८/ २०२० मुंबई पोलीस कायदा क. १२२ प्रमाणे

२) MIDC पोलीस स्टेशन जिल्हा पुणे गु.र.नं. २२३२/२०२० भा.द.वि कलम १८८ प्रमाणे

३) चिखली पोलीस स्टेशन जिल्हा पुणे गु.र.नं. २८५ /२०२१ भा.द.वि. क. ४६१.३८०.४११ प्रमाणे

४) भोसरी पोलीस स्टेशन, पुणे गु.र.नं. ६९४ / २०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे

५) भोसरी पोलीस स्टेशन, पुणे गु.र.नं. ३३/ २०२२ भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे

६) भोसरी पोलीस स्टेशन, जिल्हा पुणे गु.र.नं.३६/२०२२ भा.द.वि कलम ३७९,३४ प्रमाणे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक/राजेंद्र सानप नगर तालुका पोलीस स्टेशन,पो.उप.नि./रणजीत मारग,पोहेकॉ/शैलेश सरोदे,पोना/आनंद घोडके,मपोना/ गायत्री धनवडे,पोकॉ/संदीप जाधव,पोकॉ/विशाल टकले, पोकॉ/ज्ञानेश्वर खिळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top