शिंदे - बडे परिवाराचा नवीन व्यवसाय "येवले अमृततुल्य" नगरच्या वैभवात भर घालणारा - आमदार संग्राम जगताप.
नगर प्रतिनिधी.(29. जानेवारी.) : नगर शहरातील पुणे एसटी स्टँड समोर अर्जुन शिंदे आणि प्रवीण बडे यांनी सुरू केलेल्या येवले अमृततुल्य या चहाच्या दालनाचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आज थाटात उद्घाटन करण्यात आले.यावेळी आ. संग्राम जगताप यांनी सांगितले कि शिंदे आणि बडे परिवाराने मिळून सुरू केलेला नवीन व्यवसाय " येवले अमृततुल्य "हा नगर शहराच्या वैभवात भर घालणारा आहे. या व्यवसायातून त्यांना स्वतःला रोजगार तर झालाच परंतु त्यापासून आणखी दोन-चार लोकांना रोजगार त्यांच्यापासून मिळाला. आपण आपल्या संस्कृतीनुसार येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार हा चहाच्या आग्रहाने करत असतो त्याचप्रमाणे नगरचे नागरिक सुद्धा आपल्या दालनात आग्रहाने येऊन चहाचा स्वाद घेत राहतील. हे दालन शहराच्या मध्यवस्तीत आणि विशेष म्हणजे एसटी स्टँड समोर असल्याने प्रवास करून थकून येणारे व्यक्ती चहाच्या स्वादामुळे त्यांचा थकवा दूर करू शकतील.यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी शिंदे आणि बडे परिवारास नवीन व्यवसायासाठी खुप भरभरून शुभेच्छा दिल्या.
आमदार संग्राम जगताप उद्घाटनासाठी आल्यावर त्यांना शिंदे आणि बडे कुटुंबातील महिलांनी ओवाळून त्यांचे स्वागत केले. यावेळी अर्जुन शिंदे,सौरभ शिंदे,चंद्रशेखर शिंदे,प्रवीण बडे,शुभम बडे,येवले चहाचे संघर्ष माळाळे,नगरसेवक सचिन शिंदे,अजय चितळे,मनोज दुलम,पै.वैभव वाघ, पै.राम वाघ,मिलिंद भालसिंग, संदीप चीने, मनोज लांडे, अभिनंदन वाळके,गणेश साळुंके,चितळे सर,रमेश जाधव, सतीश चौधरी,शशिकांत देशमुख, सत्यजित धुमाळ,रामदास कवडे, संजय कोकाटे,सुधीर लकारा,अण्णासाहेब सोळंके,अमोल येटेकर,झिंजुर्डे सर,भैया निमसे,प्रा. संदीप ठोंबरे,आदित्य जपे, गणेश गुळवे, प्रणव दराडे,प्रसाद नरोटे,प्रणव पवार,सोन्याबापु शिंदे,शरद सुगंधी,राजू बिज्जा,राजू बुरा आदि नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.