भारतीय जनता पक्षाकडे ॲड.धनंजय जाधव यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातून उमेदवारी मिळणेबाबत केली मागणी.
नगर,प्रतिनिधी. (03. जानेवारी.) : नाशिक पदवीधर मतदार संघातून उमेदवारी मिळणेबाबत ॲड धनंजय कृष्णा जाधव यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली आहे.मी नाशिक पदवीधर मतदार संघात गेल्या एक वर्षापासून नाशिक पदवीधर हक्क समितीच्या माध्यमातून नाव नोंदणी केली आहे. मतदार संघातील शिक्षक कर्मचारी व सामान्य पदवीधारकांसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्या- साठी प्रयत्न केले आहेत. मी स्वतः वकील असल्यामुळे संपूर्ण मतदारसंघात वकिलांशी व इतर सर्व क्षेत्रातील लोकांशी माझे चांगले संबंध आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षवाढीचे कार्य करत आहे. मला नाशिक पदवीधर मतदार संघाची संपूर्ण माहिती आहे. अहमदनगर जिल्ह्यातून सर्वात जास्त मतदार नोंदणी झालेली आहे,मी नगर जिल्ह्यातला असल्याने मी नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी करण्यास इच्छुक आहे असे ॲड धनंजय जाधव यांनी भारतीय जनता पक्षाकडे मागणी केली आहे.