फायर ब्रिगेड आमदार शहाजी बापू पाटील नवीन वर्षात सर्वांसमोर येणार एका नव्या रूपात.

Ahmednagar Breaking News
0

शिंदे गटाचे नेते आमदार शहाजी बापू पाटील यांनी आठ दिवसात तब्बल नऊ किलो वजन केले कमी.

नगर,प्रतिनिधी. (02.जानेवारी.) : सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे आता सर्वांसमोर एका नवीन रुपात येणार आहेत. त्यांनी केवळ आठ दिवसात तब्बल नऊ किलो वजन कमी केले आहे. बंगळुरू मधील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेल्या दहा दिवसांपासून शहाजी बापू पाटील हे मुक्कामी असून तेथे त्यांनी पंचकर्माच्या माध्यमातून आपले वजन कमी केले आहे. आता नवीन वर्षात शहाजी बापू पाटील हे नव्या रूपात आपल्या समोर येणार आहेत. आमदारांसारखी व्यक्ती जर स्वतःसाठी पंचकर्माच्या माध्यमातून आपले वजन कमी करू शकते तर सामान्य माणसांनी पण याचा विचार करावा आणि स्वतःसाठी हे फायदेशीर आहे हे समजून घेऊन श्री श्री रविशंकर यांचे कोर्सेस करावे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top