ॲड.धनंजय जाधव यांनी मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनील पंडित यांची घेतली भेट.
नगर,प्रतिनिधी. (04.जानेवारी.) : मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनिल पंडीत यांची नाशिक पदवीधर मतदार संघाचे इच्छुक उमेदवार ॲड.धनंजय जाधव यांनी भेट घेतली.अनेक वर्षांपासून शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे.शिक्षकांच्या या प्रश्नांसोबतच सुशिक्षीत बेरोजगरांच्या समस्या सोडविण्यास अग्रक्रम देणार असल्याचा विश्वास नाशिक पदवीधर मतदार- संघासाठी भारतीय जनता पार्टी-मित्र पक्षाकडुन इच्छुक उमेदवार ॲड.धनंजय जाधव यांनी दिला.ॲड.धनंजय जाधव यांनी अहमदनगर शहरातील विविध सामाजिक संस्था,शैक्षणिक संस्था अहमदनगर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला.नाशिक पदवीधर मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ असून प्रचारासाठी दिवस कमी आहेत. त्यामुळे निवडणुकीतील विजयाची सर्व मदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आहे. प्रत्येक पदाधिकारी हा दिवसरात्र झटत आहे.आता प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याची गरज आहे. प्रत्येक मतदाराला त्यांच्या समस्या सोडविण्याचा विश्वास द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आजच्या दौऱ्यात त्यांनी अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनील पंडित यांची भेट घेतली. याप्रसंगी शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न असो की अन्य प्रश्न असो, प्रत्येक शिक्षकाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांना दिला.याप्रसंगी विश्व हिंदु परीषदेचे जिल्हा सहमंत्री गौतम कराळे,भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष स्वप्निल दगडे आदी उपस्थित होते.