प्रा.अविनाश बेडेकर सर यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

अहमदनगर शहरातील बेडेकर क्लासेसचे संचालक प्रा.अविनाश बेडेकर यांचे दुःखद निधन.

नगर, प्रतिनिधी. (24. जानेवारी.) : नगर शहरातील इंग्रजी विषयासाठी प्रसिद्ध असलेले बेडेकर क्लासेसचे संचालक प्रा. अविनाश बेडेकर (वय 79)यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा  बुधवार 25 रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासून निघेल.

त्यांच्या पश्यात पत्नी, मोठा भाऊ ( श्रीकांत बेडेकर) , 2 मुली, (  अस्मिता आणी श्रद्धा ) मुलगा (प्रसाद बेडेकर) पुतण्या (सुजित बेडेकर) 2 सुना , 4 नातवंडे असा परिवार आहे.

सर गेले 56 वर्ष अव्याहतपणे शिक्षक म्हणून कार्यरत.हजारो विद्यार्थ्यांना घडवणारे विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून ते परिचित होते.जिल्ह्यातील अनेक शाळातून 10 वीच्या विद्यार्थ्यांना विशेष कार्यशाळेतून त्यांनी मार्गदर्शन केले.नाट्य शलाका संस्थेच्या माध्यमातून नगरमध्ये प्रथम एकांकिका स्पर्धा,आणि बालनाट्य स्पर्धेचे त्यांनी आयोजन केले.इंग्रजी व्याकरण शिकवण्याची खास पद्धत म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये खास लोकप्रिय होते.उत्तम कवी,अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top