विद्यार्थ्यांनी अनुभवली परमवीरचक्र विजेत्यांची शौर्यगाथा.- वृषाल दत्तात्रय एकबोटे.

Ahmednagar Breaking News
0

विद्यार्थ्यांनी अनुभवली परमवीरचक्र विजेत्यांची शौर्यगाथा.- वृषाल दत्तात्रय एकबोटे.

नगर,प्रतिनिधी.(29. जानेवारी.) : पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालयात प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित परमवीरचक्र विजेत्यांची शौर्यगाथा उपक्रमातंर्गत स्वातंत्र्य टिकविण्यासाठी ज्या वीर जवानांनी रणांगणावर शौर्य गाजविले व प्राणाची पर्वा न करता देशासाठी बलिदान दिले. त्या परमवीरचक्र विजेत्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी वृषाल दत्तात्रय एकबोटे यांनी पुरमचक्र विजेते हा कार्यक्रम सादर केला. सौ वैशालीताई एकबोटे यांनी शौर्यगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.

सुत्रसंचालन श्रीमती संगिता गुंड मॅडम यांनी केले.यावेळी पिंपळगाव माळवीच्या सरपंच सौ राधिकाताई प्रभूणे, उपसरपंच  मच्छिंद्र झिने,तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामराव साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमासाठी नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पवार सर, शिक्षक व शिक्षकेतर वृंद,तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर वृंद आणि आजी, माजी सैनिक उपस्थित होते.

वृषाल एकबोटे यांनी सादर केलेल्या उपक्रमाबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सध्याच्या मुलांना मोबाईल मधील गेम खेळणे, नवनवीन गाणे ऐकणे, पाहणे,सिनेमा पाहणे याबाबत माहिती आहे, परंतु परमवीरचक्र काय आहे ते का दिले जाते, परमवीरचक्र विजेते कोण आहेत याबाबतची माहिती वृषाल एकबोटे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. ते ऐकून विद्यार्थीही खुश झाले.अशा उपक्रमामुळे ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहित नाहीत त्या गोष्टी माहिती व्हायला मदत होते असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top