ॲड.धनंजय जाधव यांना स्वाभिमानी शिक्षक संघटनेचा पाठिंबा.

Ahmednagar Breaking News
0

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार ॲड.धनंजय जाधव यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यास स्वाभिमानी शिक्षक संघटनेचा पाठिंबा.-प्रसाद शिंदे.

नगर प्रतिनिधी.(05. जानेवारी.) : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२३ नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी ॲड.धनंजय जाधव यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्यास स्वाभिमानी शिक्षक संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे.छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेतील उमेदवार म्हणून ॲड.धनंजय जाधव हे बहुजन, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक,महिला इत्यादी पदवीधरांचे प्रश्न चांगल्या पध्दतीने सोडवतील अशी आशा आहे.तसेच भारतीय जनता पक्षाने ॲड.धनंजय जाधव यांना नाशिक पदवीधर मतदार संघाची उमेदवार दिल्यास स्वाभिमानी शिक्षक संघटना त्यांच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करेल असे प्रतिपादन स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top