शैक्षणिक क्षेत्रामध्ये मौल्यवान व गौरवशाली कार्याबद्दल सन्मान.

Ahmednagar Breaking News
0

ब्रह्माकुमारीज विद्यालय अहमदनगरच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये मौल्यवान व गौरवशाली कार्याबद्दल सन्मानपत्र द्वारे सत्कार व अभिनंदन.

नगर प्रतिनिधी. (28. जानेवारी.) : रथसप्तमी (जागतिक सूर्य दिन) निमित्त रेसिडेन्शिअल हायस्कूल लालटाकी रोड अहमदनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022 या वर्षात शैक्षणिक क्षेत्रामध्ये मौल्यवान गौरवशाली कार्याबद्दल सर्व शिक्षक आणि शिक्षिका वर्गाचा ब्रह्माकुमारीज विद्यालय अहमदनगर च्या वतीने सन्मान पत्र देत सत्कार व अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमात प्राचार्य विजयकुमार पोकळे सर आणि शिक्षक वर्गाच्या उपस्थितीत पाथर्डी सेवाकेंद्र इन्चार्ज बी के सुवर्ण दीदी यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना नियमितता या मूल्यावर अनमोल असे मार्गदर्शन केले व ध्यानधारणा सत्र घेतले. अहमदनगर सेवाकेंद्र वरिष्ठ राजयोग शिक्षिका बी के निर्मला दिदी यांनी प्राचार्य आणि शिक्षक व शिक्षिका या सर्वांना सन्मानपत्र देत सन्मानित केले. 

त्याचबरोबर भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पाचवी ते दहावीतील 617 विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली या परीक्षेत प्रथम क्रमांक चि . जाधव गणेश द्वितीय क्रमांक चि . नागेश संकेत, चि . कासार संदेश व तृतीय क्रमांक चि . काकडे जयदत्त चि . दराडे तन्मय या विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार अभिनंदन बी के निर्मला दीदी यांच्या हस्ते करण्यात आले. 

तसेच समाज अभ्यास इतिहास भूगोल उपक्रम शिक्षक गौरव पुरस्कार श्री म्हस्के सर यांचा बी के निर्मला दिदी यांच्या हस्ते   मानचिन्ह देत करण्यात आला.

 त्याचबरोबर उपक्रम शिक्षक प्राचार्य विजयकुमार पोकळे सर यांचा प्रमाण पत्र देत बी के निर्मला दीदी यांनी सत्कार केला. 

या कार्यक्रमात विशेष सहयोगी श्री घुंगार्डे सर, माझी आर टी ओ अधिकारी संजय गोसावी, बी के नरेश भाई, बी के रश्मीताई, बी के नारायण भाई, बी के वैशाली ताई, बी के साईनाथ भाई आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सेवक वर्ग उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top