खा.सुजय विखे पाटील यांनी कुस्तीचा आनंद लुटला.

Ahmednagar Breaking News
0

खा.सुजय विखे पाटील यांनी कुस्तीचा आनंद लुटला.

नगर,प्रतिनिधी.(26.जानेवारी.) : प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीगोंदा येथे पै.राजेंद्र आबा म्हस्के व पै.आप्पासाहेब सोनवणे मित्र परिवारातर्फे आयोजित भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ म्हणजे कुस्ती.खा.सुजय विखे पाटील यांनी या मैदानास भेट देऊन मनसोक्त कुस्ती आखाड्यातील  लढती पाहण्याचा आनंद लुटला.खा.सुजय विखे पाटील यांचे हलगीच्या वाद्यात  स्वागत करण्यात आले.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते  छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले. खासदारांच्या हस्ते श्रीगोंद्याची सुकन्या पै.भाग्यश्री फड  हिचा सत्कार करण्यात आला. आलेल्या सर्व पैलवानांना खासदारांनी विखे पाटील परिवार आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते ,पै तानाजी जाधव, पै अनिकेत घुले, माजी आमदार राहुल जगताप, प्रताप सिंह पाचपुते, संदीप नागवडे, बाबासाहेब खोत आदी मान्यवर आणि मोठ्या प्रमाणात कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top