अहमदनगर प्रेस क्लबचे उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार जाहीर.

Ahmednagar Breaking News
0

 ✍🏻 अहमदनगर प्रेस क्लबचे उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार जाहीर.

✍🏻 सुधीर लंके, मिलींद देखणे, विठ्ठल लांडगे, राजेंद्र झोंड, नंदकुमार सातपुते, महेश देशपांडे, रियाज शेख, दिपक मेढे, सुनील भोंगळ, दत्ता इंगळे, प्र. के. कुलकर्णी, नरहर कोरडे, अनिल पाटील यांना मान्यवरांच्या नावाने ‘स्मृती पत्रकारीता पुरस्कार’ जाहीर.

अहमदनगर प्रतिनिधी. (04. जानेवारी.) : आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध दैनिकांमध्ये कार्यरत असणार्‍या पत्रकारांना यावर्षीचा ‘उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय पत्रकारीता क्षेत्रात मोलाची कामगीरी बजावणार्‍या मान्यवरांच्या नावाने यावर्षीपासून स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले असून हे पुरस्कार दरवर्षी दिले जाणार असल्याची माहिती अहमदनगर प्रेस क्बचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी दिली.

अहमदनगर प्रेस क्लबच्या कार्यकारीणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणार्‍या प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारांबद्दल चर्चा करण्यात आली व कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

स्व. भास्करराव डिक्कर यांच्या स्मरणार्थ गेल्या वर्षीपासून पुरस्कार सुरू करण्यात आला. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजेश सटाणकर यांना जाहीर करण्यात येत आहे. यावर्षीपासून सुरू करण्यात येत असलेले अन्य पुरस्कार व पुरस्कारार्थीची नावे- स्व. नवनीतभाई बार्शीकर स्मृती पत्रकारीता पुरस्कार- सुधीर लंके (लोकमत), स्व. दा. प. आपटे स्मृती पत्रकारीता पुरस्कार- मिलींद देखणे (सामना), स्व. जनुभाऊ काणे स्मृती पत्रकारीता पुरस्कार- विठ्ठल लांडगे (लोकआवाज), स्व. आचार्य गुंदेचा स्मृती पत्रकारीता पुरस्कार- राजेंद्र झोंड (पुण्यनगरी), स्व. सुधीर मेहता स्मृती पत्रकारीता पुरस्कार- नंदकुमार सातपुते (ज्येष्ठ पत्रकार), स्व. नंदकुमार सोनार स्मृती पत्रकारीता पुरस्कार- महेश देशपांडे महाराज, स्व. प्रकाश भंडारे स्मृती पत्रकारीता पुरस्कार- रियाजभाई शेख (दर्शक), स्व. प्रकाश सावेडकर स्मृती पत्रकारीता पुरस्कार- दिपक मेढे (ज्येष्ठ पत्रकार), स्व. पांडुरंग रायकर स्मृती पत्रकारीता पुरस्कार- सुनील भोंगळ (एबीपी माझा), स्व. जितेंद्र आगरवाल स्मृती पत्रकारीता पुरस्कार- दत्ता इंगळे (छायाचित्रकार), स्व. रमाकांत बर्डे स्मृती पत्रकारीता पुरस्कार - प्र. के. कुलकर्णी, स्व. गोपाळराव मिरीकर स्मृती पत्रकारीता पुरस्कार- नरहर कोरडे (ज्येष्ठ पत्रकार) यांना जाहीर करण्यात आला आहे. आकाशवाणीसाठी प्रतिकुल परिस्थितीत बातमीदारी केल्याबद्दल विशेष सन्मान- अनिल पाटील यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षी विशेष बातमीदारी करणार्‍या प्रत्येक दैनिकाच्या प्रतिनिधींना गेल्या वर्षीपासून ‘उत्कृष्ट पत्रकारीता’ असा पुरस्कार देत आहोत. यावर्षीचे पुरस्कारप्राप्त पत्रकार- अरुण नवथर (सकाळ), अण्णासाहेब नवथर (लोकमत), बंडू पवार (दिव्य मराठी),  ज्ञानेश दुधाडे (सार्वमत), समीर दाणी (पुण्यनगरी), गोरख शिंदे (पुढारी), अशोक सोनवणे (लोकमंथन), जयंत कुलकर्णी (प्रभात), सुर्यकांत नेटके (ऍग्रोवन), सुर्यकांत वरकड (लोकआवाज), रामदास ढमाले (अजिंक्य भारत), अशोक झोटींग (मराठवाडा केसरी), करण नवले (राष्ट्र सह्याद्री), दिलीप वाघमारे (केसरी), सुरेश वाडेकर (समाचार), निशांत दातीर (नवाकाळ), सुनील हारदे (नवा मराठा), सुहास देशपांडे (नगर सह्याद्री), मनोज मोतीयानी (अहमदनगर घडामोडी), रमेश देशपांडे (नगर टाईम्स), सुभाष चिंधे (नगर स्वतंत्र), राम नळकांडे (नगरी दवंडी), विठ्ठल शिंदे (राज आनंद), आबीद खान (मखदूम), गजेंद्र राशीनकर (पराक्रमी), विजय सांगळे (आकर्षण), पप्पू जहागीरदार (अहमदनगर एक्सप्रेस) यांना वर्षीचा उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच व्हीडीओग्राफी द्वारे उत्कृष्ट बातमीदारी केल्याबद्दल निलेश आगरकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

पत्रकार दिनी म्हणजेच दि. ६ जानेवारी रोजी या पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक राकेश ओला, महापौर रोहीणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे आदींच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top