जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भावांना भिंगार कॅम्प पोलिसांनी केली अवघ्या काही तासातच अटक.
नगर,प्रतिनिधी. (05. जानेवारी.) : दि.03/01/2023 रोजी फिर्यादी नामे सोमनाथ भानूदास बेरड रा. शहापुर ता. नगर जि. अहमदनगर यांचे घराचे समोर राहणारे शहापुर गावचे सरपंच दत्तात्रेय दिलीप भालसिंग व त्यांचा भाऊ संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंग असे दोघे हातात लोखंडी कोयता व लोखंडी तलवार घेऊन फिर्यादीचे घरात घूसून फिर्यादीस घराचे बाहेर ओढून फिर्यादी याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीचे कारणावरून शहापुर गावचे सरपंच दत्तात्रेय दिलीप भालसिंग व त्यांचा भाऊ संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंग यांनी फिर्यादीस धक्काबुक्की करून शिवीगाळ,दमदाटी करून फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने सरपंच दत्तात्रेय दिलीप भालसिंग याने त्याचे हातातील कोयता सरपंचाचा भाऊ संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंग याचे हातातील तलवार फिर्यादीचे अंगावर भिरकावली त्यावेळी फिर्यादी यांनी वार हुकवला त्यावेळी घटना ठिकाणी हजर असलेला फिर्यादीचा साक्षीदार भाऊ सतिष भानूदास बेरड याचे नाकावर लागून ते जखमी झाले बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं 07/2023 भा द वि कलम307,352,452,323, 504,506,34 सह आर्म अँक्ट 4/25प्रमाणे दि.02/01/2023 रोजी फिर्यादी सोमनाथ भानूदास बेरड रा.शहापुर ता. नगर जि. अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा रजि.दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात आरोपी हे गुन्हा घडले पासून फरार होते त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई/एम के बेंडकोळी हे करीत आहेत.दि.03/01/ 2023 रोजी यातील आरोपी नं 01 सरपंच दत्तात्रेय दिलीप भालसिंग हे सैनिक नगर, डेअरी फार्म, भिंगार येथे तसेच आरोपी नं 02 संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंग हा सावेडी, नगर मनमाड रोड, अहमदनगर येथे येणार असल्याची गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे दोन वेगवेगळे पथक तयार करून तसेच तांत्रीक विश्लेषन करून आरोपींना शोधण्याकरीता सापळा लावला असता यातील आरोपी नं 01 सरपंच दत्तात्रेय दिलीप भालसिंग हे सैनिक नगर, डेअरी फार्म, भिंगार हा सैनिक नगर, डेअरी फार्म परीसरात मिळून आला तसेच सरपंचाचा भाऊ आरोपी नं 02 संतोष उर्फ हेमराज दिलीप भालसिंग हा सावेडी, नगर मनमाड रोड, अहमदनगर येथे मिळून आल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली असून त्यांना दि.04/01/2023 रोजी मा.न्यायालयासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने त्यांना 02 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. रिमांड कालावधीमध्ये आरोपींनी गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पो. स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमर देशमुख, पोसई/एम के बेंडकोळी, पोहेकाँ/479 गोविंद जठार, पोहेकाँ/शफीक शेख, पोहेकाँ/रवनाथ मिसाळ, पोहेकाँ/गणपत जठार, पोना/ 2178 राहुल द्वारके, पोना/1407 भानूदास खेडकर, पोना/ 1072 राहुल गोरे, पोकाँ/महादेव निमसे, पोकाँ/रमेश दरेकर, चापोकाँ/संजय काळे यांनी सदरची कारवाई केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई/एम के बेंडकोळी हे करीत आहेत.