ॲड. युवराज पोटे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी.

Ahmednagar Breaking News
0

ॲड. युवराज पोटे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी.

नगर, प्रतिनिधी.(22. जानेवारी.) : पब्लिक ट्रस्ट  प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. युवराज पोटे यांची आज निवड करण्यात आली असून, सचिवपदी ॲड. नदीम सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. असोसिएशनच्या उपाध्यपदाची संधी ॲड विजय मुनोत यांना देण्यात आली असून सहसचिवपदी ॲड. विनायक सांगळे व खजिनदार म्हणून वैभव साबळे यांची निवड करण्यात आली आहे.

धर्मदाय आयुक्त कार्यालयात काम करणाऱ्या वकीलांची ही संघटना असून, या पब्लिक ट्रस्ट  प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या सभासदांची काल सायंकाळी नगरमध्ये वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये संस्थेच्या सन 2023-2025  या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी ॲड. युवराज पोटे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

यावेळी कार्यकारी मंडळातील सदस्यांची निवडही  घोषित करण्यात आली. त्यानुसार ॲड.गौरव मिरीकर, ॲड. योगेश मांडोत, ॲड.स्वप्निल काकड, ॲड. तेजस्विनी काकड, ॲड. बबनराव कवडे, ॲड. राजेंद्र वाबळे यांची निवड करण्यात आली. असोसिएशनच्या काल झालेल्या या बैठकीत प्रारंभी मागील दोन वर्षांच्या कार्यकाळातील कामाचा आढावा मावळते अध्यक्ष  ॲड. राजेंद्र वाबळे यांनी व सचिव ॲड. वैभव साबळे यांनी सादर केला. असोसिएशच्यावतीने यापूर्वी करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचाही  या सभेत आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यात सभासदांच्या व जिल्ह्यातील विश्वस्तांच्या प्रश्नावर यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी नूतन अध्यक्ष ॲड. युवराज पोटे व नवीन पदाधिकाऱ्यांचा असोसिएशनच्या उपस्थित असलेल्या सदस्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ॲड. युवराज पोटे यांनी पुढील दोन वर्षे संस्थेच्या सभासद हितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. नुकत्याच सुरु झालेल्या ई-फायलिंगवरुन वकील व पक्षकारांना सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावर योग्य पद्धतीने सभासदांचे समाधान होईल, असे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्वच विश्वस्तांसाठी यापूर्वी जसे उपक्रम राबविले, तसेच नव्या बदलांना सामोरे जाणारे उपक्रम राबविणार असल्याचे आश्वासन दिले.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top