रात्रीतून निवडणुकीचे चित्र बदलून टाकू.- खा.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

रात्रीतून निवडणुकीचे चित्र बदलून टाकू.- खा.सुजय विखे पाटील.

नगर,प्रतिनिधी.(26. जानेवारी.) नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाचे चित्र रात्रीतून बदलण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असं वक्तव्य खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं ते श्रीगोंद्यात बोलत होते.नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपने अद्याप कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दर्शविलेला नाही. या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

खा.सुजय विखे पाटील श्रीगोंद्यात कुस्त्यांच्या मैदानास भेट देण्यास आले होते,यावेळी त्यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे योग्य वेळी पक्षाचा निर्णय देतील. निवडणूक जवळ आली असली तरी एका रात्रीमध्ये निवडणूक बदलण्याची क्षमता नगर जिल्ह्याच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेमध्ये आहे. ज्या माणसाचं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून येईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि रात्रीतून चित्र बदलून टाकू. अशी क्षमता प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे याची अनुभूती सगळ्या जिल्ह्याला येईल. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top