जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.
नगर,प्रतिनिधी.(05.जानेवारी) : अहमदनगर जिल्ह्यातील तिसगांव,ता.पाथर्डी व मठपिंप्री,ता.नगर येथे घरफोडी व जबरी चोरी करणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे.बातमीची हकिगत अशी की,यातील फिर्यादी श्री. नंदकुमार सिताराम गाडगे (वय 59, रा.माधवनगर,तिसगांव, ता.पाथर्डी) यांचे घराचे दरवाजाचा कडीकोंडा तोडुन आत प्रवेश करुन घरातील कपाटाची व सामानाची उचकापाचक करुन अज्ञात आरोपींनी 1,12,500/- किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुननेले होते.सदर घटने बाबत फिर्यादी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1109/2022 भादविक 454, 380 प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घटना घडल्यानंतर श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा,यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे,पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे,बबन मखरे, संदीप पवार,मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे,दत्तात्रय गव्हाणे,संदीप घोडके,देवेंद्र शेलार,विश्वास बेरड,पोना/शंकर चौधरी,विशाल दळवी, राहुल सोळुंके,संतोष लोढे,भिमराज खर्से,ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/सागर ससाणे,मच्छिंद्र बर्डे,आकाश काळे,कमलेश पाथरुट योगेश सातपुते,विनोद मासाळकर,जालिंदर माने,चापोहेकॉ/बबन बेरड, उमाकांत गावडे,चंद्रकांत कुसळकर व भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोलावुन घेवुन नमुद ना उघड गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास तात्काळ रवाना केले.पथक शेवगांव व पाथर्डी परिसरात पेट्रोलिंग करुन ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असतांना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,वर नमुद गुन्ह्यातील आरोपी खरवंडी ते पाथर्डी रोडवर,टाकळी फाटा येथे थांबलेले आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे तात्काळ खरवंडी ते पाथर्डी रोडने टाकळी फाटा येथे जावुन नमुद संशयीत आरोपींचा शोध घेत असतांना काही इसम पोलीस पथकाची चाहुल लागताच शेतात पळुन जावु लागले पथकाने त्यांचा पळत जावुन पाठलाग करुन एका संशयीत इसमास शिताफीने ताब्यात घेतले व त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला, त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नावे 1) सोपान ऊर्फ टोण्या भाऊसाहेब काळे,वय 19, रा. लखमापुरी,ता. शेवगांव असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस करता तो समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागला त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने सदर गुन्हा साथीदारासह केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपीस अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने तपास करुन अहमदनगर जिल्ह्यात आणखीन कोठे कोठे व किती ठिकाणी चोरी केली आहे याबाबत विचारणा करता त्याने नगर तालुक्यातील मठपिंप्री येथे एका महिलेस धाक दाखवुन कानातील व गळ्यातील मंगळसुत्र चोरी केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 806/2022 भादविक 392, 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने आरोपीस पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे सोपान ऊर्फ टोण्या भाऊसाहेब काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व बीड जिल्ह्यात जबरी चोरी व घरफोड असे गंभीर स्वरुपाचे एकुण -03 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. पाथर्डी 1109/2022 भादविक 454, 380, 34
2. नगर तालुका 806/2022 भादविक 392, 34
3. गेवराई, जिल्हा बीड 405/2022 भादविक 457, 380, 34
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग, अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.