स्थानिक गुन्हे शाखेने गावठी हातभट्टी अड्ड्यांवर टाकले छापे.

Ahmednagar Breaking News
0

स्थानिक गुन्हे शाखेने गावठी हातभट्टी अड्ड्यांवर टाकले छापे.

नगर,प्रतिनिधी.(२६ जानेवारी) : स्थानिक गुन्हे शाखेने नगर पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन ०३ आरोपी विरुध्द कारवाई करुन १,४६,०००/- (एक लाख शेहेचाळीस हजार) रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने २,६०० लि. कच्चे रसायन व १६० लि. तयार दारु यावर पथकाने कारवाई केली आहे.

श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सफौ/भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ,पोहेकॉ / विजय वेठेकर,संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी,राहुल सोळंके,लक्ष्मण खोकले, पोकॉ/रणजीत जाधव व चापोहेकॉ/अर्जुन बडे यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.२३/०२/२३ व दि.२४/०२/२३ रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून ०३ ठिकाणी छापे टाकुन एकुण १,४६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे २,६०० लि.कच्चे रसायन, १६० लि.गावठी हातभट्टीची दारू जप्त करुन ०३ आरोपीं विरुध्द नगर तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण ३ गुन्हे दाखल करण्यात अली आहे.

सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, श्री. अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top