आम्ही घडलो आणि तुम्हाला सुद्धा घडवणार. - समाधान सोळुंके पोलीस उपनिरीक्षक.

Ahmednagar Breaking News
0

आम्ही घडलो आणि तुम्हाला सुद्धा घडवणार. - समाधान सोळुंके पोलीस उपनिरीक्षक.

नगर,प्रतिनिधी.(13. जानेवारी.) : आधुनिक भारताचे निर्माते स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन स्मरणार्थ साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यासाठी भारत सरकारने 1984 मध्ये पहिल्यांदा घोषित केले होते. तेव्हापासून स्वामी विवेकानंदांची जयंती दरवर्षी 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या औचित्य साधून संजय नगर सेव वस्तीमध्ये सेवामहर्षी डॉ.एस.के. हळबे बालभवन येथे संजय नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, बालभवन आणि उडान यांच्या संयुक्त विद्यमाने *"वीर डिफेन्स मार्गदर्शन केंद्राचे"* उद्घाटन समारंभ प्रसंगी संजय नगर मधील युवकांना आणि मुलांना मार्गदर्शन केले.

            युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि आदर्श घेऊन स्वविकासाबरोबर राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करावे आणि त्यांच्या साहित्याचे सर्वानी वाचन करावे. "आम्ही घडलो आणि तुम्हाला सुद्धा घडवणार" याप्रकारे मार्गदर्शन करत असताना, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री.समाधान सोळंके यांनी अध्यक्षीय भाषणात संजय नगर मधील युवकांना आणि मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीमध्ये संजय नगर पुनर्जन प्रकल्पाचे सहसंचालक सौ. वैशाली चोपडा यांनी स्वामी विवेकानंदांच्या एका घटनेचा प्रसंग घेऊन मुलांना छान पद्धतीने मार्गदर्शन केले. आपल्या मातृभाषेची कशाप्रकारे सन्मान करायला पाहिजे यांनी स्वामी विवेकानंदांच्या उदाहरणातून मुलांना त्याचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर बालपणाचे प्रकल्प व्यवस्थापक उषा खोल्लम आणि छेडल्यांची केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी सुद्धा मुलांना मार्गदर्शन केले आणि वीर डिफेन्स मार्गदर्शन केंद्राचे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात उत्साहात संपन्न होण्यासाठी निलोफर शेख, विकास सुतार, मंजुषा गावडे, ऋतिक लोखंडे, शारदा न्यायपल्ली, पोटे सर, आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली जुनी, ओम शिंदे यांनी केले. या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या प्रमुख मान्यवरांचे आभार मुस्कान जुनी या विद्यार्थ्यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top