श्री.गजानन महाराज मंदिरात सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर.

Ahmednagar Breaking News
0

श्री.गजानन महाराज मंदिरात सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर.

नगर,प्रतिनिधी.(31. जानेवारी.) : गुलमोहर रोड,नवलेनगर परिसरातील श्री.गजानन महाराज मंदिराचे सुशोभीकरणाचे काम जोरात सुरू असून मंदिराच्या बाहेरील चारही बाजूस ग्रॅनाईट बसविण्याचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मंदिर परिसरातील भाविक झावरे परिवाराने मंदिरासाठी ग्रॅनाईटची भेट दिली होती,मंदिर प्रशासनाने लगेच ग्रॅनाईट मंदिराला बसवण्याचे काम सुरू केले. तरी ज्या भाविकांना मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत करायची असेल त्यांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन नवलेनगर रहिवासी सेवा संस्था यांनी केले आहे.13 फेब्रुवारी रोजी श्री.गजानन महाराजांचा प्रकटदिन असून मंदिराला ग्रॅनाईट बसवण्याचे काम प्रकटदिनाच्या अगोदर पूर्ण करण्याचा मानस आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top