अहमदनगर सायक्लोथॉनसाठी देश विदेशातील 2000हून अधिक सायकल पटू हजर.
नगर,प्रतिनिधी.(25. फेब्रुवारी.) : अहमदनगर सायक्लोथॉनसाठी अहमदनगर जिल्हासह देश विदेशातील 2000हून अधिक सायकलपटू हजर झाले आहे.उद्या दि.26. फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या सायक्लोथॉनसाठीची तयारी पूर्ण झाली असून किट घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. महाराष्ट्रातील विविध शहरातील प्रमुख सायकलपटू हजर झाले आहेत.
नाशिक सायकलिंग फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने यांनी सांगितले की त्यांच्या नाशिक जिल्ह्यातून 200 हून अधिक सायकलपटू या स्पर्धेसाठी भाग घेणार आहेत. सायकलिंग मध्ये मोठमोठे रेकॉर्ड केलेले सायकलपटू देखील या स्पर्धेसाठी हजर असणार आहेत,असे अहमदनगरचे सायकलपटू शरद काळे पाटील यांनी सांगितले.
स्पर्धकांच्या सायकल ठेवण्यासाठी स्पर्धा सुरू होण्याच्या ठिकाणी (द्वारका लॉन) येथे पार्किंगची सोय केली आहे.येथे आलेल्या नागरिकांच्या स्वागतास्तव कार्यक्रमात अमिताभ बच्चन फेम प्राध्यापक शशिकांत पेडवाल,पुणे यांनी स्वतः बच्चन सरांच्या आवाजात बच्चन सरांचे गाणे, कविता, डायलॉग म्हटले त्यास उपस्थित नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
नगरचा बालकलाकार आरुष प्रसाद बेडेकर (योग योगेश्वर जय शंकर.)या मालिकेतील बाल वयातील शंकर महाराजांची भूमिका साकारलेला बालकलाकाराची उपस्थिती या ठिकाणी नागरिकांचे लक्ष वेधत होती. त्याला पाहून नागरिक त्याच्या हातात हात मिळवून फोटो,सेल्फी काढण्याचा आग्रह करत होते.