अहमदनगर सायक्लोथॉनसाठी देश विदेशातील 2000हून अधिक सायकलपटू हजर.
नगर,प्रतिनिधी.(25.फेब्रुवारी.) : अहमदनगर सायक्लोथॉनसाठी देश विदेशातील 2000हून अधिक सायकलपटू हजर झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातून नाशिक सायकलिंग फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने यांच्यासह दोनशेहून अधिक सायकलपटू या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवणार आहेत. अहमदनगर सायक्लोथॉनचे हे चौथे वर्ष असून नाशिक सायकलिंग फाउंडेशनचे सदस्य या स्पर्धेत गेल्या तीन वर्षापासून भाग घेत आहेत. यावर्षी या स्पर्धेत 2000 सायकलपटूंनी भाग घेतला असून पुढील वर्षीपासून या संख्येत वाढ होण्यासाठी आमच्याकडून जी जमेल ती मदत आम्ही करू असे आश्वासन अहमदनगर सायक्लोथॉनचे गौरव फिरोदिया यांना किशोर माने यांनी केले आहे.