मोटरसायकलपटू शरद काळेंनी संपूर्ण साडेतीन शक्तीपीठ 25 तासात मोटरसायकलवर पुर्ण केले.
नगर,प्रतिनिधी.(18.फेब्रुवारी.) : मोटरसायकलपटू शरद काळेंचा साडेतीन शक्तीपीठ मोटरसायकलवर कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा मानस आहे. आज सकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी त्यांनी रेणुका मातेचे दर्शन घेऊन माहूरगड,जि. नांदेड येथून सुरवात केली आहे.त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे.त्यांना ABN तर्फे शुभेच्छा.
शरद काळे यांनी माहूरगड ते तुळजापूर 350 किमी चे अंतर 6 तासात पुर्ण केले.त्यांचे तुळजापूर येथे इंजिनीयर भोसले यांनी देवस्थानच्या वतीने स्वागत केले.
तसेच तुळजापूर ते कोल्हापूर हे 280 किमी चे अंतर फक्त 5 तासात केले पुर्ण.त्यांचे करवीर निवासिनी अंबाबाईच्या देवस्थानने स्वागत केले. अंबाबाईचे दर्शन करून शरद काळे पुढील म्हणजेच सप्तशृंगी गड (वणी) देवीच्या दर्शनास निघाले. त्यांना त्यांचे मित्रपरिवार नातेवाईक आप्तेष्ट सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
कोल्हापूर ते सप्तश्रुंगी गड (वणी )हे 580.किमीचे अंतर 11तास 30मिनिटे मध्ये पूर्ण केलं. सप्तशृंगी गडावर देवीचे मुख्य पुजारी भूषण देशमुख यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना देवीचे दर्शन करून घेतले.यावेळी त्यांच्या सोबत हेमंत काळे आणि बढे साहेब उपस्थित होते.