खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील 702 विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप.

Ahmednagar Breaking News
0

महाज्योतीच्या वतीने जिल्ह्यातील 702 विद्यार्थ्यांना खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या हस्ते मोफत टॅबचे वाटप.


नगर,प्रतिनिधी.(13.फेब्रुवारी.) : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) नागपूर मार्फत अहमदनगर जिल्ह्यातील ७०२ विद्यार्थ्यांना खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्याहस्ते मोफत टॅबचे आज वितरण करण्यात आले.यावेळी इतर मागासवर्ग बहूजन कल्याण विभागाचे नाशिक विभाग उपसंचालक डॉ.भगवान वीर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, समाजकल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

महाज्योती या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास – प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, जीईई/नीट/एमएचटी-सीईटी/एमपीएससी/युपीएससी आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्हयातील विदयार्थ्यांसाठी महाज्योती मार्फत ९६१ टॅब प्राप्त झाले आहेत. यापैकी ७०२ टॅबचे आज वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत टॅबलेट सोबत दररोज ६ जीबी इंटरनेटचा डाटा मोफत दिला जातो.

खासदार डॉ.विखे पाटील यावेळी म्हणाले की, महाज्योतीच्या टॅबमुळे अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या प्रशिक्षणाची पुस्तके अपलोड करता येणार आहेत‌. ऑनलाईन पद्धतीने स्वतःचा अभ्यास पूर्ण करता येणार आहे. विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत तसेच आपल्या शिक्षकांसोबत अभ्यासासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकणार आहेत‌. टॅब हे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वरदान ठरणार आहेत.

डॉ.वीर म्हणाले, महाज्योती मोफत टॅबलेट योजना राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटली दुनियेत एक पाऊल पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरेल. राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल. या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

उर्वरित २५९ टॅबचे अद्याप वितरण बाकी आहे. हे टॅब प्राप्त करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचे व पालकांचे आधारकार्ड, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, इयत्ता १०वी चे गुणपत्रक व बोनाफाईड प्रमाणपत्रासह सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, अहमदनगर कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन श्री. देवढे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top