स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल आठ लाख रुपये किमतीचा मांगूर मासा केला जप्त.

Ahmednagar Breaking News
0

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल आठ लाख रुपये किमतीचा मांगूर मासा केला जप्त.

नगर, प्रतिनिधी. (01.फेब्रुवारी.) : जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकानं तब्बल 8 लाख रुपये किंमतीचा मांगूर मासा जप्त केलाय.या माशाचं वजन 4 हजार किलो असल्याचं सांगण्यात आलंय.

अहमदनगर एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार मनोहर शेजवळ,पोहेकाँ संदीप पवार, मनोहर गोसावी, संदीप घोडके, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप चव्हाण, पोकाँ कमलेश पाथरुट, चालक पोहेकाँ भरत बुधवंत यांच्या पथकानं ही कारवाई केलीय.केंद्र सरकारनं या माशाच्या विक्री आणि वाहतुकीवर बंदी घातली आहे. मात्र या माशाची मध्यप्रदेशकडे वाहतूक केली जात आहे,अशी माहिती अहमदनगर एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत समजली.त्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकानं नेवासे तालुक्यातल्या माळीचिंचोरा परिसरात आयशर टेम्पोसह मांगूर जातीचा हा मासा जप्त केला. या कारवाईत एलसीबीच्या पथकानं दोघांना अटक केलीय. बप्पा ताजरुल विश्वास आणि तोकामल मियाराज विश्वास (रा.पश्चिम बंगाल) अशी या दोघांची नावं आहेत.अहमदनगरच्या मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांनी या माशाची पहाणी करुन हा मासा मांगूर जातीचा असल्याची आणि या माशापासून भारतीय प्रजातीच्या माशांना धोका असल्याचं सांगितलं. या दोघांविरुध्द नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top