श्री रेणुकादेवी संस्थान माहूर येथील पूर्वीचेच विश्वस्त मंडळ तूर्त कायम.- औरंगाबाद खंडपीठाचे आदेश.
सह धर्मदाय आयुक्तांना फेरचौकशीचे आदेश.
नांदेड,माहूर,प्रतिनिधी. (01. मार्च.) : माहूर मधील श्री रेणुकादेवी संस्थानवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नियुक्त झालेले प्रथम विश्वस्त मंडळ तूर्त कायम ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तसेच या प्रकरणात अशासकीय सदस्य नियुक्ती बाबत फेरचौकशी करा असेही खंडपीठाने सह धर्मदाय आयुक्त यांना सांगितले आहे.श्री रेणुकादेवी संस्थान माहूर येथील २०१४ मध्ये अस्तित्वात आलेले प्रथम विश्वस्त मंडळ कायम करण्याचे निर्देश ही उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.जी. चपळगावकर व न्यायमूर्ती मंगेश एस.पाटील यांनी दिला.
साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथील श्री रेणुका देवी संस्थान च्या अशासकीय विस्वस्तांचा वाद उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू होता.याचिका कर्ते समीर किरण भोपी यांनी सह धर्मदाय आयुक्त यांच्या १० /१०/१९ च्या आदेशा विरोधात विधितज्ञ रमेश धोर्डे आणि त्यांचे सहाय्यक ऍड प्रवीण दिघे यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सूनवाई होऊन एस.जी.चपळगावकर व न्यायमूर्ती मंगेश एस.पाटील यांनी सह धर्मदाय आयुक्तयांनी १६ ऑक्टोंबर १९ रोजी नवीन तीन विश्वस्त नेमनुक संदर्भात दिलेला आदेश चुकीचा,स्पष्टपणे मनमानी,लहरी,आणि बेकायदेशीर असल्याचे नमूद करत सदर चा आदेश रद्दबातल ठरविला. व प्रकरण सह धर्मदाय आयुक्त यांच्या कडे वर्ग केले.याचिकाकर्ते आणि प्रथम विश्वस्त मंडळाचे सदस्य असलेल्या याचिकाकर्त्यांना आणि इतर विश्वस्तांना संधी देऊन नवीन चौकशी करण्याचे आदेश देऊन प्रथम विश्वस्त मंडळ कार्यरत राहील असा निर्वाळा दिल्याने २०१४ च्या प्रथम अशासकीय विश्वस्त मंडळातील सदस्य असलेले भवणीदास भोपी,समीर भोपी व श्रीपाद भोपी यांना कायम केले आहे.