प्रत्येकला संधी देणारा भाजप पक्ष : भैय्या गंधे.
नगर,प्रतिनिधी.(17.फेब्रुवारी.) : भारतीय जनता पार्टी देशात व राज्यात सत्तेत आहे. मात्र शहरात विरोधी बाकावर आहे. नगरच्या महापलिकेत सक्षम विरोधीपक्षाची भूमिका भाजप बजावत आहे. स्थायी समितीमध्ये ही पक्ष प्रभावीपणे आपली बाजू मांडत आहे. भाजपाच्या प्रत्येक नगरसेवकास पदाची संधी मिळावी असा दृष्टीकोन पक्षाचा आहे. स्थायी समितीच्या सदस्यपदी नव्याने निवड झालेले प्रदीप परदेशी व पल्लवी जाधव हे उत्कृष्ट काम करून शहराच्या विकासास चालना देतील, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी भाजपाचे प्रदीप परदेशी व पल्लवी जाधव यांची निवड झाल्याबद्दल भाजपच्या गुलमोहर रोडवरील संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, संजय ढोणे, प्रताप परदेशी, कल्पेश परदेशी , मल्हार गंधे, महाविर कांकरीया, मंगेश खंगले, सिध्देश नाकाडे, ऋग्वेद गंधे, भाग्यश्री कुलकर्णी व सपना पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी नूतन सदस्य प्रदीप परदेशी व पल्लवी जाधव यांनी पक्षाच्या ध्येयधोरणाने स्थायी समितीत काम करू असे सांगितले.