भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत नगर दक्षिण मतदारसंघासाठी साडेचार कोटी रूपये मंजूर - खा.डाॅ.सुजय विखे पाटील.
मुंबई,प्रतिनिधि.(14. फेब्रुवारी.) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत दक्षिण नगर मतदारसंघातील सात तालुक्यासाठी साडे चार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
दक्षिण नगर मतदारसंघातील शेवगाव (05),अहमदनगर ग्रामीण(06), पारनेर(05), पाथर्डी(06),कर्जत(11), श्रीगोंदा(05), राहुरी(17) या तालुक्यातील स्मशानभूमीत शेड उभारणे व पेव्हर ब्लॉक बसविणे,दलित वस्ती सुधारणा तसेच राष्ट्र पुरूषांच्या स्मारकांचे सुशोभीकरण करणे याबरोबरच सांस्कृतिक भवन,वाचनालय, विपश्यना केंद्र उभारणे, दूरूस्ती करणे यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून याचे काम तात्काळ सुरू करावयाचे असल्याचे त्यांनी सांगितले.मुंबई येथे सामाजिक न्याय विभागात या संबंधीची आज विशेष बैठक संपन्न झाली, या बैठकीत या आठ तालुक्यातील 55 कामांना मंजूरी देण्यात आली.या सर्व तालुक्यातील कामे ही दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करणार असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. दरम्यान राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आल्या पासून अवघ्या तीन महिन्यात मोठ्याप्रमाणात या भागास विकास निधी हा मिळाला असून याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जाहीर आभार त्यांनी व्यक्त केले आहेत.