स्वातंत्र्यानंतर जेष्ठ नागरिकांसाठी काम करणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदीच- खा.डाॅ.सुजय विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

स्वातंत्र्यानंतर जेष्ठ नागरिकांसाठी काम करणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदीच- खा.डाॅ.सुजय विखे पाटील.

पारनेर,प्रतिनिधि. (20. फेब्रुवारी.) : देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली मात्र जेष्ठ नागरिकांचा विचार करून त्यांच्या अडचणी जाणून त्यासाठी योजनेच्या माध्यमातून फूंकर घालणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदीच असे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगून राष्ट्रीय वयोश्री योजनेतून देशातील लाखो जेष्ठ नागरिकांना त्यांनी आधार दिल्याचे सांगितले. ते अळकुटी तालुका पारनेर येथे बोलत होते.अळकुटी तालुका पारनेर येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ  व राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

या समारंभास भाजपचे तालुका अध्यक्ष वसंतराव चेडे, विश्वनाथ कोरडे, पं.स. सदस्य दिनेश बाबर,राहुल शिंदे,डॉ खिलारी, बंडूशेट रोहकले,सुभाष दूधडे,किरण कोकाटे,शालींदर औटी, सरपंच डॉ कोमल भंडारी,उपसरपंच आरिफ पटेल, महावितरण अभियंता चरडे ,कार्यकारी अभियंता पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेष्ठ नागरिकांचा विचार करून आयुष्याच्या या वळणावर जेष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री ही योजना आणली या योजनेंतर्गत व्हिल चेयर, श्रवण यंत्र,चष्मा, काठी, कमोड, कंबरेचा बेल्ट,मानेचा बेल्ट हे साहित्य  मोफत देण्याचे त्यांनी ठरविले, त्यांच्या या संकल्पने नुसारच आपल्या जिल्ह्य़ात या योजनेंतर्गत नाव नोंदणी केली आणि जवळपास पन्नास हजार पेक्षा जास्त जेष्ठ नागरिकांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली मात्र असा विचार करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत असे सांगताना खा.विखे यांनी घरी गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिता आपण देवाकडे उदंड आयुष्य आणि पुन्हा एकदा 2024 मध्ये तेच पंतप्रधान झाले पाहिजे अशी प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित आजी-आजोबांना केले. 

2019 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पुढील निवडणुकी पूर्वी घरोघरी नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी देईल असे आश्वासन दिले होते, याच आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी जल जीवन हे मिशन संपूर्ण देशात राबविण्‍यात येत असून या अंतर्गत आपल्या भागातील अळकुटी नळ पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ देखील आज केला असे सांगताना ते म्हणाले की आता आपल्या मायमाऊलीच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा जाऊन थेट घरात पिण्याचे पाणी नळाद्वारे मिळणार आहे. 

केंद्र आणि राज्य सरकार हे सर्वसामान्यांचे आहे ते कायम  त्यांच्यासाठी काम करते असे खा.डाॅ.सुजय विखे यांनी सांगतानाच शासन आपल्या दारी ही योजना आपल्या साठी महसूल विभागाने आणली असून आपल्याला दैनंदिन व्यवहारासाठी लागणारे कागदपत्रे आता आपल्या घरपोहच मिळणार आहेत. पुढील महिन्यात आपल्या भागात हे अभियान घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नव्याने मंजूर झालेल्या ट्रान्सफार्मर सबस्टेशनच्या काम हे देखील लवकरच पूर्ण करणार होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमात नाव नोंदणी केलेल्या जेष्ठ नागरिकांना खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. 

या समारंभास सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

        "शासन आपल्या दारी" कार्यक्रमाच्या आढावा.

मार्च महिन्यात होणारया शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीचा आढावा खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी या कार्यक्रमा नंतर आधिकारयांच्या उपस्थितीत घेतला. यावेळी उपस्थित आधिकारी तससेच स्वयंसेवक यांना कार्यक्रमा संबंधित सुचना देऊन येणारया प्रत्येक व्यक्तीचे काम झाले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. या करिता आवश्यक त्या बाबी आणि संबंधित तलाठी,ग्रामसेवक आणि इतर कर्मचारी यांनी उपस्थित राहाणे हे बंधनकारक असल्याचे सांगताना कोणालाही सुट्टी मिळणार नाही अशा सुचना यावेळी त्यांनी दिल्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top