स्थानिक गुन्हे शाखेकडून सात वर्षापासून पकड वॉरंट मधील फरार आरोपी पुणे जिल्ह्यातून जेरबंद.

Ahmednagar Breaking News
0

स्थानिक गुन्हे शाखेकडून सात वर्षापासून पकड वॉरंट मधील फरार आरोपी पुणे जिल्ह्यातून जेरबंद.


नगर,प्रतिनिधी (04.फेब्रुवारी) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा गुन्हयातील मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अहमदनगर (स्पेशल कोर्ट) यांचेकडील ०७ वर्षापासून पकड वॉरंट मधील फरार आरोपी पुणे जिल्हयातून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अहमदनगर (स्पेशल कोर्ट) यांचे कडील शेशन केस नंबर १७१/२०१५ मधील आरोपी नामे गणेश नाना शिरोळे (मुळ रा.कडा, ता.आष्टी,जि.बीड) याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले बाबत तोफखाना पो.स्टे.गुरनं ४८/२०१५ भादवि कलम ३६३,३६६(अ),३७६,(२) (आय) सह पोस्को कलम ३(अ),४,९ (एल).१० प्रमाणे दि. २५/०२/२०१५ रोजी गुन्हा दाखल झाला होता.सदर आरोपीस अटक झाल्यानंतर तो जामीनावर सुटल्यानंतर फरार झाला होता व आत्तापर्यंत न्यायालयात हजर झाला नव्हता.त्यामुळे मा. न्यायालयाने त्यास समक्ष हजर करणेकामी पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांचेकडे पकड वॉरंट जारी केले होते.वरील गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांना सूचना देऊन पकड वॉरंट बजावणी कामी आदेशीत केले होते.वरील आदेशाप्रमाणे मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अहमदनगर (स्पेशल कोर्ट) यांचेकडील शेशन केस नंबर १७१/२०१५ बाबत श्री. अनिल कटके,पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा यांनी आरोपीबाबत माहिती काढून पकड वॉरंट बजावणीकामी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदारांनी वेळोवेळी कडा ता.आष्टी,जि. बीड तसेच पुरंदर,जि.पुणे याठिकाणी जाऊन शोध घेतला असता तो मिळुन येत नव्हता.श्री.अनिल कटके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी सदर गुन्हयातील आरोपीचा पाठपुरावा करुन सदर वॉरंट बाजवणीकामी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोहेकॉ/संदीप पवार, बापूसाहेब फोलाणे,पोना/शंकर चौधरी,भिमराज खरसे, रविकिरण सोनटक्के,दिलीप शिंदे,लक्ष्मण खोकले,पोको/रविद्र घुंगासे,योगेश सातपुते मेघराज कोल्हे,चापोहेकॉ./ संभाजी कोतकर यांचे पथक तयार करून सदरचे पकड़ वारंट बजावणीबाबत आदेश दिले होते.त्यावरुन नमुद पथक वॉरंटमधील आरोपी गणेश नाना शिरोळे याचे पकड़ वॉरंट बजावणी करीता कडा ता.आष्टी येथे त्याचे रहाते घरी व परीसरात गेले असता तो मिळून आला नाही. त्याचे बद्दल सखोल माहिती घेतली असता सदरचा आरोपी हा निरा ता.पुरंदर,जि.पुणे येथे वास्तव्यास असलेबाबत गोपनिय माहिती काढून वरील पथकाने तात्काळ निरा ता.पुरंदर येथे जाऊन तेथील परिसराची माहिती घेऊन व आरोपी रहावयास असलेल्या ठावठकाणाची खात्रीशिर माहिती काढून आरोपी नामे गणेश नाना शिरोळे यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी तोफखाना पो.स्टे.ला हजर केले आहे.सदरची कारवाई डॉ.श्री.बी. जी.शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र,नाशिक,श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक,श्री.अनिल कातकडे उप विभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top