बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार.
मुख्य नियामक हिंदी विषयाची संयुक्त सभा रद्द.
नगर,प्रतिनिधी.(22.फेब्रुवारी.) : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या मागण्या जैसे थे असल्याने, त्यांनी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यानुसार परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी हिंदीच्या उत्तरपत्रिका तापसणीवर मुख्य नियामकांनी (चिफ मॉडरेटर) बहिष्कार घातला असून, यापुढील विषयांच्या उत्तरपत्रिकाही न तपासण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या शिक्षकांनी मांडली.
■ संयुक्त सभेवर बहिष्कार.
महासंघाच्या पुणे विभागाच्या वतीने शिक्षकांनी उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन बुधवारी केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधकाऱ्यांनी व हिंदी विषयाच्या मुख्य नियामक यांनी संयुक्त सभेवर बहिष्कार टाकला. व अतिशय सनदशीर मार्गाने तसे निवेदन राज्य मंडळाच्या सचिव माननीय अनुराधा ओक मॅडम व सह सचिव माननीय प्रिया शिंदे मॅडम यांना देण्यात आले.त्यामुळे आजची हिंदी विषयाची मुख्य नियामकांची सभा रद्द करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासण्यात येणार नाही; तसेच संयुक्त सभेवरही बहिष्कार घालण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे यापुढील सभा ही आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत युक्त सभेबाबत निर्णय होणार नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.यावेळी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष डॉ मिलिंद कांबळे ( हिंदी विषय तज्ञ), पुणे शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर तुकाराम साळुंखे माननीय पडवळ सर माननीय शहापुरे सर प्राध्यापक राहुल गोलांडे. हिंदी संघाचे सचिव प्राध्यापक रेवदनाथ कर्डिले खजिनदार आनंद काशीकर ,कोल्हापूर शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व नऊ विभागातून आलेले हिंदी विषयाचे सी.एम तसेच विषय तज्ञ म्हणून डॉक्टर नेहा बोरसे मॅडम व डॉक्टर दीप्ती सावंत मॅडम,हिंदी अध्यापक संघटनेचे व पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.