केडगाव बायपास येथे एकाचा खून.
नगर,प्रतिनिधी.(24.फेब्रुवारी.) : कोतवाली पोस्टे हद्दीत दिनांक 23/02/23 रोजी रात्री 10.30 ते 11.15 चे सुमारास अरुण नाथा शिंदे रा.नेप्ती हे व शिवाजी किसन होले रा.पेट्रोल पंपा जवळ,कल्याण रोड,अहमदनगर हे दोघे केडगाव बायपास येथे कराळे यांचे धाबे जवळ असताना तीन अज्ञात इसमांनी येऊन शिवाजी होले यांच्यावर गोळीबार केला व त्यामध्ये शिवाजी होले हे मयत झाल्याची घटना घडलेली आहे.
सदर घटनेच्या अनुषंगाने कोतवाली पो स्टे येथे 186/2023, भा दं वि 302,397,34 सह आर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.