नगरसेवक योगीराज गाडे आणि रामदासशेठ आंधळे यांनी केले हनुमान चालीसा पाठ व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन.

Ahmednagar Breaking News
0

नगरसेवक योगीराज गाडे आणि रामदासशेठ आंधळे यांनी केले हनुमान चालीसा पाठ व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन.

नगर,प्रतिनिधी.(25.फेब्रुवारी.) : गुलमोहररोड परिसरातील नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे पा.आणि रामदासशेठ नानाभाऊ आंधळे यांनी श्री.दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ,सर्जेपुरा द्वारा प्रस्तुत हनुमान चालीसा पाठ व भजन संध्याचे आयोजन केले आहे. रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक 8:30 वाजता गुलमोहर रोड येथील पारिजात चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन योगीराज गाडे आणि रामदासशेठ आंधळे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top