मोक्क्यातील आरोपीला २१ महिन्यात जामीन मंजूर...
नगर,प्रतिनिधी.(02. फेब्रुवारी.) : घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, उरुस ज्ञानदेव चव्हाण व त्याचे साथीदारांविरुद्ध भा.द.वि. कलम ३९५, १२०(ब) व मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला दि. १७/४/२०२१ रोजी अटक करण्यात आली होती.
त्यानंतर उरुस ज्ञानदेव चव्हाण याने अहमदनगर येथील ऍड.महेश तवले,ऍड.संजय दुशिंग व ऍड. अक्षय दांगट यांचे मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर यांचे न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र उरुस चव्हाण यास मोक्का कायदा तंतोतंत लागु होत नाही असे त्याचे वकीलांनी मा.न्यायालयाचे निदर्शनास आणुन दिले. त्याचप्रमाणे गुन्ह्याचा तपास पुर्ण झाला आहे व गुन्ह्यातील इतर आरोपींना मा. उच्च न्यायालयाने जामीनावर खुले केले आहे असा युक्तीवाद उरूस चव्हाण याचे वकीलांनी केला.
सरकार पक्षातर्फे आरोपीने गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला आहे, त्याला जामीन देवू नये अशी मागणी करण्यात आली, परंतू दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुण मा.न्यायालयाने आरोपी नामे उरुस चव्हाण यास तब्बल २१ महिन्यानंतर जामीनावर खुले केले.
आरोपीतर्फे ऍड.महेश तवले, ऍड.संजय दुशिंग व ऍड.अक्षय दांगट,अहमदनगर यांनी काम पाहिले.