सराफ बंडूशेठ उर्फ राजेंद्र चिंतामणी यांच्यावर खुनी हल्ला.
पाथर्डी,प्रतिनिधी.(23.फेब्रुवारी.) : पाथर्डी शहरातील सराफ बंडूशेठ उर्फ राजेंद्र चिंतामणी, वय अंदाजे 52 वर्षे, धंदा सोनार, राहणार शेवगाव रोड, आनंदनगर, अर्जुना लॉनजवळ, पाथर्डी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर यांना त्यांचे घराजवळ अज्ञात 3 इसमांनी मोटार सायकलवर येऊन धारदार शस्त्राने मारहाण केल्याची घटना घडलेली आहे.त्यात ते गंभीर जखमी झालेले आहेत.
सदर बाबत अधिक माहिती घेता असे समजते की,- श्री बंडूशेठ चिंतामणी यांचे पाथर्डी शहरातील नवीपेठ येथे सोन्या-चांदीचे दुकान आहे. आज दिनांक 23/2/2023 रोजी रात्री नेहमीप्रमाणे ते त्यांचे दुकान बंद करून घरी जात असताना, त्यांचे घराजवळ 1 मोटरसायकलवर 3 अज्ञात इसम येऊन, त्यांचे दुचाकी वाहन अडवून, त्यांच्याकडील लोखंडी हत्याराने त्यांचे डोक्यात मारहाण करून जखमी केले आहे. मारहाणीमुळे त्यांचे शरीरातून रक्तस्राव झाला आहे. नमूद अज्ञात इसमांनी त्यांचेजवळ असलेली पिशवी हिसकावून नेली आहे. त्या पिशवीमध्ये दुकानाच्या चाव्या होत्या. त्यामध्ये सोन्या-चांदीच्या काही वस्तू नसल्याचे समजते. श्री बंडूशेठ चिंतामणी यांना ज्या 3 अज्ञात इसम यांनी मारहाण केली. त्यापैकी एकास ते ओळखत असल्याचे सांगत आहे.
श्री बंडूशेठ चिंतामणी यांना पुढील औषधोपचारा करिता पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.सदर घटनेच्या निषेधार्थ उद्या दिनांक 24/2/2024 रोजी सर्व पक्षीयांच्या वतीने पाथर्डी शहर बंद पुकारण्यात आला असून,मोर्चा काढण्यात येणार असल्याचे समजते.