पोस्ट कर्मचार्यांची मोफत नेत्र तपासणी.

Ahmednagar Breaking News
0

नियमित डोळ्यांची तपासणी केल्यास अनेक समस्या दूर होतील- डॉ.स्मिता पटारे.

नगर,प्रतिनिधी.(22. फेब्रुवारी.) : आज आहार विहार बरोबरच मोबाईल, कॉम्प्युटर यामुळे कमी वयातच डोळ्यांच्या समस्या उद्भवत आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याने कमी वयात चष्मा लागतो. पोस्ट कर्मचार्यांचे कामही संगणकावरच असल्याने त्याचा डोळ्यावर परिणाम होतो. थकवा जाणवतो, डोळे दुखणे असा समस्यांला समोरे जावे लागते. त्यासाठी काही नियम पाळल्यास डोळ्याच्या समस्या जाणवणार नाहीत. कॉम्प्युटरवर सलग काम केल्यास काहीवेळ सहा मीटर दूर पहावे. त्यामुळे डोळ्यावरील ताण कमी होईल. त्याचबरोबरच नियमित आपल्या डोळ्यांचे तपासणी करुन चष्म्याचा नंबर तपासून घ्यावा. संघटनेने कर्मचार्यांच्या नेत्रतपासणीच चांगला उपक्रम राबविला असल्याचे, प्रतिपादन प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.स्मिता पटारे यांनी केले.

डॉ.पटारे आय क्लिनिक, फिनिक्स फौंडेशन यांच्यावतीने पोस्ट कर्मचार्यांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सिनियर पोस्टमास्तर संदिप कोकाटे, पोस्टल संघटनेचे नेते संतोष यादव, डॉ.स्मिता पटारे, फिनिक्स फौंडेशनचे जालिंदर बोरुडे, स्वप्नील ठाकूर, इम्रान शेख, रुपाली डाके, स्वाती जाधव, शितल मकासरे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी जालिंदर बोरुडे म्हणाले,  पोस्ट कर्मचारी आपली प्रामाणिक सेवा बजावत आहेत. दैनंदिन काम करतांना अनेकांना शारीरिक समस्या जाणवत असतात. त्यामुळे कर्मचार्यांनी नियमित आपली आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी आज पोस्ट कर्मचार्यांनी मोफत नेत्रतपासणी करुन त्यांना मार्गदर्शन केले आहे. त्याचा निश्चितच त्यांना फायदा होणार आहे. फौडेशनच्यावतीने पोस्ट कर्मचार्यांसाठी असे आरोग्यदायी शिबीरे  नियमित राबवू, असे सांगितले.याप्रसंगी संदिप कोकाटे म्हणाले, पोस्ट कर्मचार्यांच्या उन्नत्तीसाठी विविध उपक्रम संघटनेच्यावतीने राबविले जात आहेत. त्या माध्यमातून त्यांची प्रगती साधली जात आहे. आजच्या आरोग्यदायी उपक्रमाचा त्यांना चांगला फायद होणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी संतोष यादव म्हणाले, पोस्टल संघटना कर्मचार्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशिल आहे. प्रशासकीय उपक्रमाबरोबरच सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमाचे नियमित आयोजन केले जात आहे. आज फिनिक्स फौंडेशन व पटारे आय क्लिनिकच्या माध्यमातून कर्मचार्यांची नेत्र तपासणी झाल्याने त्यांना चांगले मार्गदर्शन मिळाले असल्याचे सांगितले.

.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top