कर्करोग दिनानिमित्त विखे पाटील फाउंडेशनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन.

Ahmednagar Breaking News
0

कर्करोग दिनानिमित्त विखे पाटील फाउंडेशनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन.



नगर,प्रतिनिधी.(03. फेब्रुवारी.) : जागतिक कर्करोग दिन 2023 च्या निमित्ताने डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभाग अहमदनगर,आरंभ सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनच्या प्रांगणामध्ये खालील तीन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

1. जागतिक कर्करोग दिन 2023 कार्यक्रम.

2. आशाताई वर्कर साठी कर्करोग विषयक कार्यशाळा.

3. 25 कॅन्सर फायटर च्या अहमदनगर ते गडचिरोली जनजागृती कार रॅलीस झेंडा.

सदर कार्यक्रम सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आयोजिले आहेत.

कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी सर्वांनी परस्पर सहयोगाने कार्य करणे आवश्यक आहे.त्यासाठी सर्व नागरिकांना आणि पत्रकार बांधवांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती आहे. 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top