खेळांच्या स्पर्धांमधून ग्रामिण भागातून चांगले खेळाडू निर्माण होतील. - खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील..

Ahmednagar Breaking News
0

खेळांच्या स्पर्धांमधून ग्रामिण भागातून चांगले खेळाडू निर्माण होतील. - खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील.

टिळकनगर,प्रतिनिधी. (27.फेब्रुवारी.) : नामदार चषक क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामिण भागातून चांगले क्रिकेटपटू निर्माण होतील. खेळांच्या स्पर्धामुळे युवकांमध्ये सहकार्य , आत्मविश्वास व ऐक्यची भावना निर्माण होते असे विचार खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी व्यक्त केले. दत्तनगर येथे नानासाहेब शिंदे व श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. संगिताताई शिंदे व मैत्री ग्रुप दत्तनगर यांनी आयोजित केलेल्या नामदार चषक2023 भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणा कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. प्रथमतः सकाळच्या सत्रातील क्रिकेट सामन्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित दर्शवून नाणेफेक केली.नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाचे त्यांनी नानासाहेब शिंदे यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सिनेअभिनेते गोलमाल फेम श्रेयस तळपदे व तुझी माझी रेशीम गाठ फेम अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व आता तु चाल पुढं मालिका फेम डॉ.बाळासाहेब खेंडके , सेलिब्रेटी अँकर आर जे अक्षय यांनी उपस्थित प्रेक्षकांशी हसत खेळत संवाद साधला.खा.डॉ.सुजयदादा विखे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजयी संघाना बक्षीसांचे वाटप करण्यात आले.या  स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे रु 1,11,111/- ( प्रायोजक :सनफ्रेश अँग्रो,लॅक्टालिस इंडिया ) बक्षीस दिपक अण्णा पटारे इलेव्हन , कारेगाव संघ .व्दितीय क्रमांकाचे रु77,777/- (प्रयोजक : दिपक अण्णा पटारे. तालुकाध्यक्ष भाजपा) बक्षीस राजयोद्धा क्रिकेट संघ रांजणगाव औरंगाबाद ,तृतीय क्रमांक रु55,555/- (प्रायोजक सर्जेराव मुंढे हॉटेल सद्गुरु ) बक्षीसे फ्रेन्डस् क्लब राहाता.चतुर्थ क्रमांक ,33,333/(प्रायोजक आरिफभाई शेख नसिब स्टिल दत्तनगर ) बक्षीस नॅशनल क्लब हरेगाव यांना तर मॅन ऑफ दि सिरीज नितीन फुलपगार बेस्ट बॅटसमन सरजिल बागवान , बेस्टबॉलर बाळू हिवाळे , मॅनऑफ दि मॅच किरण भगत यांना बक्षीसे देण्यात आली. याप्रसंगी दिपक अण्णा पटारे (भाजपा तालुका अध्यक्ष ) संजय फंड(माजी नगराध्यक्ष ) शरद नवले ( जिल्हा परिषद सदस्य )दिलिप नागरे (माजी नगरसेवक ) लक्ष्मणराव कुमावत (माजी नगरसेवक )आंबादास पा. ढोकचोळे (संचालक ,मुळा प्रवरा )शंकर पाठक ( अँडमिस्ट्रेटव्ह हेड लॅक्टालिस इंडिया ) अविनाश कुदळे ( संचालक , श्री इम्पेक्स फर्निचर ) निलेश लहारे ( ग्रामविकास अधिकारी ) बाळासाहेब ढोकचौळे (सरपंच रांजणखोल ) शंतनु फोफसे आदी उपस्थित होते.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नानासाहेब शिंदे ,पी एस निकम , भिमाभाऊ बागुल ,रवि अण्णा गायकवाड ,बाळासाहेब विघे,सागर भोसले , जनाभाऊ खाजेकर,शरद भणगे , अरुण बागुल,प्रदिप गायकवाड ,संदिप बागुल ,पंकज बागुल,प्रितम मंत्री,संदिप कदम,अविनाश जगताप,सरजिल बागवान,शुभम शेळके,राजु खाजेकर,भरत परदेशी,नितिन फुलपगार , गणेश वाघ,संदिप त्रिभुवन,दिपक खैरनार ,राजु उदावंत , सचिन शिंदे ' शाहरुख शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी.एस.निकम यांनी केले .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top