शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तपासणी करूनच परीक्षा केंद्रावर सोडण्यास केली सुरवात.
नगर,प्रतिनिधी.(21.फेब्रुवारी.) : आज पासून बारावीच्या बोर्ड परीक्षेची सुरुवात झाली आहे.आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर असून पालकांनी आपापल्या पाल्यांना वेळेवर परीक्षा केंद्रांवर सोडले.अहमदनगर शहरातील महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची तपासणी करताना पर्यवेक्षक प्रा.संजय शेवाळे,प्रा.ज्ञानेश्वर बर्डे,प्रा.अश्विनी डावरे.यावेळी परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त होता.