श्री.गजानन महाराज मंदिरात " गण गण गणात बोते "मंत्र भेट.

Ahmednagar Breaking News
0

श्री.गजानन महाराज मंदिरात "गण गण गणात बोते"मंत्र भेट.


नगर,प्रतिनिधी.(02.फेब्रुवारी.) : गुलमोहर रोड,नवले नगर परिसरातील श्री गजानन महाराज मंदिरात चि. आरुष विनोद भिंगारे याच्या वाढदिवसानिमित्त "गण गण गणात बोते "हा गजानन महाराजांचा मंत्र स्टेनलेस स्टील मध्ये तयार करून भेट देण्यात आला. दरवर्षी आरुषच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या परिवारातील लोक काही ना काही धार्मिक कार्यक्रम किंवा मंदिरात भेट देत असतात. सध्या श्री गजानन महाराज मंदिरात जीर्णोद्धाराचे काम जोरात सुरू असून त्याच्या परिवारातील लोकांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मंदिरास हा मंत्र भेट दिला आहे. भिंगारे परिवार हा मंदिर परिसरात राहात असून कायम ते मंदिरासाठी मदत करत असतात.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top