अहमदनगर सायक्लोथॉनला सायकलपटूनीं दिला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Ahmednagar Breaking News
0

अहमदनगर सायक्लोथॉनला सायकलपटूनीं दिला उत्स्फूर्त प्रतिसाद.

नगर,प्रतिनिधी.(27. फेब्रुवारी.) : अहमदनगर सायकलींग क्लब आयोजित देशातील सर्वात मोठी सायक्लोथॉन म्हणजे "अहमदनगर सायक्लोथॉन"म्हणणं खरंच होऊन बसलंय, कारण अहमदनगर सायक्लोथॉनला सायकलपटूंनी दिलेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद.अहमदनगर शहरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रसह देश विदेशातील प्रमुख सायकलपटूंनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली होती.

सकाळी ठीक 5:30 वाजता नगर कल्याण रोडवरील द्वारका लॉन येथे सर्व स्पर्धक जमा झाले होते.तेथे सर्वांचा वॉर्म अप करून घेण्यात आला. लगेच स्पर्धकांना तेथूनच सर्व सूचना देण्यात आल्या.सर्वांनी राष्ट्रगीत म्हणून स्पर्धेला सुरुवात झाली.

सर्वप्रथम 100 किलोमीटर मधील सायकलपटूंना झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.यावेळी छायाताई फिरोदिया, गौरव शेठ फिरोदिया,तसेच अहमदनगर सायकलिंग क्लबचे सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेसाठी शहरातील डॉक्टर,वकील, इंजिनीयर,सरकारी - निमसरकारी अधिकारी-कर्मचारी, सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी या स्पर्धेत भाग घेऊन आनंद लुटला.

त्यानंतर 75 किमी ,50 किमी आणि शेवटी 20 किमी च्या स्पर्धकांसाठी झेंडा दाखवून स्पर्धा सुरू झाली.रस्त्यात ठिकठिकाणी पाण्याची,सायकल चेकिंगची,काही अडचण असल्यास प्रतिनिधींनी मदत केली.संपूर्ण स्पर्धा पूर्ण होईपर्यंत अहमदनगर सायकलिंग क्लबचे सदस्य रस्त्यात काही दुर्घटना होऊ नाही म्हणून लक्ष ठेवून होते. सायकलपटूंना काही अडचण येऊ नाही म्हणून मार्ग मोकळे करण्यासाठी,रस्त्यात जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना थांबून मार्गदर्शन करण्यासाठी ट्राफिक पोलिसांनी सहकार्य केले.

केरळ येथील ढोल पथक सर्वांसाठी विशेष आकर्षण ठरले. स्पर्धा पूर्ण होऊन येणाऱ्या स्पर्धकांचे स्वागत केरळ ढोल पथक करीत होते. त्या ढोल पथकाचा आवाज ऐकून थकून येणारे स्पर्धक आपला जसा थकवाच विसरून जात होते. स्पर्धा पूर्ण केलेल्या स्पर्धकांना अहमदनगर सायकलिंग क्लबचे सदस्य लगेच मेडल देऊन अभिनंदन करीत होते.प्रत्येक स्पर्धकांचे तेथे फोटो घेण्यात आले.स्पर्धकांसाठी विशेष नाष्ट्याची सोय आयोजकांकडून करण्यात आली होती.





Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top