राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा नगरशहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने निषेध.

Ahmednagar Breaking News
0

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा नगरशहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने निषेध

नगर, प्रतिनिधी. (05. फेब्रुवारी.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ नगर शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने फोटोची होळी करण्यात आली.यावेळी शहराध्यक्ष महेश तवले,उपाध्यक्ष सुजित खरमाळे,राजेंद्र सातपुते,ओंकार लेंडकर,अजित कोतकर,अभी शिंदे,आकाश सोनवणे,आदेश गायकवाड,किशोर कटोरे,गणेश क्षीरसागर, पियुष संचेती,अभि सोनवणे,कार्तिक तगारे,आदेश कर्डिले, कृष्णा देवकर,मंगेश खंगले,सुबत रसाळ आदी उपस्थित होते.

महेश तवले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत आहे.युवा पिढीसमोर एक आदर्श आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरत आहे.स्वतःच्या राजकारणासाठी व मतासाठी छत्रपतींचा अवमान करत असतात.जितेंद्र आव्हाड यांना जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी महाराष्ट्र राज्य सहन करणार नाही.जितेंद्र आव्हाड यांना नगर शहर युवा मोर्चाच्या वतीने काळे फासणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष महेश तवले यांनी दिला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top