सावधान.... सावधान.... सावधान....

Ahmednagar Breaking News
0

सावधान.... सावधान.... सावधान....

मिळालेल्या मालाची रक्कम चेकद्वारे कंपनीस जमा झाली तरी त्या पेमेंट बाबत कंपनी तगादा करीत आहे.

नगर,प्रतिनिधी.(26.फेब्रुवारी.) : सदरील घटना अहमदनगर शहराच्या सावेडी उपनगरात असलेल्या "सौंदर्या क्रिएशन"या कपड्याचे दुकान मालक अविनाश गुंजाळ यांच्या बाबतीत घडली आहे.अविनाश गुंजाळ यांनी सुवस्त्रम ट्रेंड्स,ग्लोबल टेक्स्टाईल मार्केट,रिंग रोड,सुरत यांच्याकडून 30 ऑगस्ट 2022 आणि 14 ऑक्टोबर 2022 रोजी साड्यांचा माल मागितला आणि तो त्यांना बरोबर मिळाला देखील. त्या दोन्ही ऑर्डर घेण्यासाठी अहमदनगर मधील गुंजाळ यांच्या दुकानात सुवस्त्रम ट्रेंड्स यांच्या वतीने हितेशकुमार प्रकाशभाई रावल हा आला होता.

त्यानंतर पेमेंटसाठी दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी हितेशकुमार रावल हा स्वतः गुंजाळ यांच्या दुकानात आला.त्यावेळी ऑर्डर प्रमाणे न आलेला माल त्याच्या हस्ते कंपनीस परत केला व उर्वरित रकमेचे त्याला दोन चेक बँक ऑफ बडोदा,शाखा सावेडी,अहमदनगरचे दिले.25 जानेवारी 2023 या दिवशीचे कंपनीच्या नावे चेक गुंजाळ यांनी रावल याच्याकडे दिले.संबंधित चेक 07 फेब्रुवारी 2023 रोजी गुंजाळ यांच्या खात्यातून कंपनीच्या खात्यात जमा झाले.

तरी 14 फेब्रुवारी 2023 रोजी सुवस्त्रम  ट्रेंड्स या कंपनीकडून विकास दाधीच हे गुंजाळ यांच्या दुकानात येऊन वरील रकमेचे चेक पास झाले असताना देखील आमच्या कंपनीच्या खात्यावर आपले पेमेंटचे चेक जमा झाले नाही असे सांगून आम्हाला आजच्या आज तुम्ही पेमेंट करून द्या असे म्हणू लागले.तरी त्यांना गुंजाळ यांनी बँकेचे स्टेटमेंट दाखवून चेक पास झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर गुंजाळ यांनी बँक ऑफ बडोदा,शाखा सावेडी येथे  जाऊन चेक कुठे आणि कोणाच्या खात्यावर कधी जमा झाले याबाबत रीतसर विचारणा केली असता, बँकेने गुंजाळ यांना त्यांनी दिलेले दोन्ही चेक सुवस्त्रम ट्रेंड्स, कॅनरा बँक,शाखा वाटेरा,राजस्थान येथे 07 फेब्रुवारी 2023 रोजी पास झाल्याबाबत सांगितले.सदरची माहिती गुंजाळ यांनी सुवस्त्रम ट्रेंड्सला कळवली आहे.तरी सदरील कंपनी सदरील चेक आमच्या खात्यावर जमा झाले नसल्याने आपण मला नवीन चेकद्वारे पेमेंट करावे अशी मागणी करित आहे.

अविनाश गुंजाळ यांना याबाबत मानसिक त्रास होत असल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांच्याकडे दि.25.फेब्रुवारी रोजी लेखी अर्ज करून सदरील माहितीची दखल घेऊन योग्य तो विचार व्हावा अशी विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top