नगरचा बालकलाकार आरुष प्रसाद बेडेकर याला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय बालकलाकारसाठी नामांकन.

Ahmednagar Breaking News
0

नगरचा बालकलाकार आरुष प्रसाद बेडेकर याला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय बालकलाकारसाठी नामांकन.


नगर,प्रतिनिधी. (16.फेब्रुवारी.) : कलर्स मराठी या वाहिनीवर मे महिन्यापासून सुरू असलेल्या आणि अत्यंत लोकप्रिय अशा योग योगेश्वर जय शंकर या मालिकेतील बालकलाकार आरुष प्रसाद बेडेकर याला कलर्स मराठी अवॉर्ड्स 2023 या मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय बालकलाकार या गटासाठी नुकतेच नामांकन जाहीर करण्यात आले आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमात आपल्या नगरच्या या बालकलाकाराला आपण सगळ्यांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहन करण्यात आल आहे. 


आरुष सध्या  रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन सेट नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत चौथीमध्ये शिकतो. इतक्या लहान वयात इतक्या मोठ्या प्रतिष्ठित वाहिनीचं नामांकन मिळणं ही आपल्या जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. गेले नऊ महिने त्याने साकारलेल्या बाल शंकर महाराजांच्या भूमिकेमुळ त्याला रसिकांचं खूप प्रेम मिळालं. रोज 14 ते 15 तास शूटिंग करून आपण कष्ट करण्यात कुठे कमी नाही हे आरुषने सुद्धा दाखवून दिल. शंकर महाराजांच्या आणि घरच्यांच्या आशीर्वादामुळेच माझ्याकडून हे काम झालं असं तो आवर्जून सांगतो.

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण सगळ्यांनी त्याला नक्की वोट करावं आणि आपल्या या बालकलाकाराला भरघोस मतांनी निवडून आणावं असं आवाहन करण्यात आला आहे.

https://www.colorsmarathi.com/cma2023/


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top