स्नेहालय परिवाराच्यावतीने जालिंदर बोरुडे यांचा ‘नेत्रदूत’ म्हणून गौरव.

Ahmednagar Breaking News
0

जालिंदर बोरुडे यांचे दृष्टीहिनांसाठीचे कार्य ‘नेत्रदूत’ सारखेच.-डॉ.गिरिष कुलकर्णी

नगर,प्रतिनिधी.(16.फेब्रुवारी.) : फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात काम करुन गरजूंना आधार देण्याचे काम केले आहे. विशेषत: नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून हजारोंना दृष्टी मिळवून देण्याचे पुण्यकर्म करत आहे. त्यांचे नि:स्वार्थ कार्य हे सामाजिक संस्थांचे मनोबल वाढविणारे आहे. स्नेहालय परिवारही समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करत आहे. आरोग्य सेवेत  जालिंदर बोरुडे यांच्यासारख्या नि:स्वार्थी व्यक्तीमत्वाचे योगदान इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे दृष्टीहिनांसाठी  ‘नेत्रदूत’ सारखेच असल्याने त्यांचा ‘नेत्रदूत’ म्हणून सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे. स्नेहालयाच्या नेत्रसेवेच्या कार्यातही ते सक्रीय सहभाग देतील, असा विश्वास असल्याचे प्रतिपादन स्नेहालयाचे डॉ.गिरिष कुलकर्णी यांनी केले.स्नेहालय परिवाराच्यावतीने नेत्र सेवेत उल्लेखनिय कार्याबद्दल फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांचा ‘नेत्रदूत’ म्हणून गौरव करण्यात आला. याप्रसंगी डॉ.गिरिष कुलकर्णी, संजय गुगळे, राजीव गुजर, अनिल गावडे, हनिफ शेख, प्रविण मुत्याल, डॉ.तन्मय धामणकर, अखिला फडणीस, अभिषेक फडणीस आदि उपस्थित होते.सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना जालिंदर बोरुडे म्हणाले, तळागाळातील लोकांसाठी काम करणार्या स्नेहालयाचे कार्य खरोखर अतुलनीय असेच आहे. समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याचे काम ते करत आहेत. आज माझा सन्मान करुन नेत्र  चळवळीचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. याप्रसंगी संजय गुगळे यांनी जालिंदर बोरुडे यांच्या कार्याचा परिचय करुन दिला तर हनिफ शेख यांनी आभार मानले. 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top