लोकांच्या शुभेच्छा व आशीर्वाद यावरच माझी घोडदौड - शरद काळे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

लोकांच्या शुभेच्छा व आशीर्वाद यावरच माझी घोडदौड  - शरद काळे पाटील.

सोनई, प्रतिनिधी. (01. मार्च.) : सायकलिंग व मोटरसायकल या दोन्ही क्षेत्रात अनेक विक्रम करणारे सोनई गावचे सुपुत्र शरद काळे पाटील यांचा नुकताच सोनई ग्रामस्थांच्या वतीने सामुदायिक सत्कार करण्यात आला . वडीलधारांचे आशीर्वाद व वेळोवेळी लोक देत असलेल्या शुभेच्छा याच्या जोरावरच माझी घौडदौड चालू आहे असे उद्गागार  सत्काराला उत्तर देताना काळे पाटील यांनी काढले. 

राज्यातील चार कोपऱ्यात असलेली शक्तिपीठे यांचा मोटरसायकलवर फक्त २५ तासात प्रवास करून एक जागतिक विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद इंडिया बुक रेकॉर्ड इंडियाने घेतली आहे. सोनई परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने सोनई सोसायटीचे चेअरमन श्री विश्वासराव गडाख यांच्या शुभहस्ते हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला गावातील मारुती मित्र मंडळ व शरद काळे पाटील मित्र मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. भाऊसाहेब शिरसाट यांनी यामध्ये पुढाकार घेतला. डॉ. चंगेडिया यांचा वाढदिवस केक कापून याच कार्यक्रमात साजरा करण्यात आला. अहमदनगर येथे भरलेल्या सायकलाथॉन मध्ये श्री सुनील बाराहाते यांनी ७५ किमी  व श्री सिद्धार्थ दरंदले याने ५० किलोमीटर सायकलिंग पूर्ण केल्याबद्दल त्यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाला सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चौधरी साहेब , शिंगणापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रामचंद्र करपे साहेब ,मारुती मित्र मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब बोरुडे, श्री प्रकाश शेटे, शिंगणापूर देवस्थानचे अध्यक्ष श्री भागवत बानकर, श्री शिवासेठ बाफना, श्री सयाराम पाटील बानकर, मुळा बँकेचे चेअरमन श्री भाऊसाहेब पाटील निमसे, श्री आप्पासाहेब निमसे, श्री बंडू भैय्या चंदेल, श्री राजेन्द्र बोरुडे, श्री महामिने सर, श्री आघाव गुरुजी , श्री शिकारे गुरुजी, श्री गडाख गुरुजी, श्री गवळी सर , श्री अहिल्याजी दराडे,  श्री संतोष तेलोरे , श्री शकील बागवान, श्री संजय चंगेडिया , श्री प्रदीप चांगेडिया, श्री मुकेश भळगट श्री बाळासाहेब बडे, श्री नितीन वेताळ, श्री अमित बंग , श्री बाबुराव घावटे,  श्री सिताराम घावटे , श्री सुदाम बनकर, श्री शंकरराव दरंदले,  श्री आत्माराम सोनवणे, श्री संदीप कुसळकर,  श्री राजेन्द्र सानप, डॉ. सौ रजनी शिरसाठ, पत्रकार श्री नवनाथ कुसळकर, पत्रकार श्री अशोक भुसारी व पत्रकार श्री खंडागळे मामा आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. काळे पाटील यांचे वडील श्री अमृतराव काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका मातोश्री सौ पुष्पलता काळे व निवृत्त कृषी अधिकारी श्री हेमंत काळे हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी शेटे यांनी केले. सर्वांनीच काळे पाटील यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top