म्हाडाची वसुली मोहीम जोरात.

Ahmednagar Breaking News
0

आर्थिक वर्ष 2022-23 म्हाडाची वसुली मोहीम जोरात. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन.


नगर,प्रतिनिधी.(07.फेब्रुवारी.) : आर्थिक वर्ष 2022 - 23 पर्यंतची थकबाकीसह भूभाडे वसुली एक जानेवारीपासून नगर कार्यालयाने सुरू केली आहे. नगर कार्यालयातील गोरख कडूस, शकील शेख, राकेश हरेर,अपर्णा पालवे हे अधिकारी, कर्मचारी स्वतः घरोघरी जाऊन नागरिकांना थकबाकी भरण्यासाठी सहकार्य करत आहेत.म्हाडाच्या चार हडको (निवासी सदनिका) आहेत. सिव्हिल हडको,प्रेमदान हडको, पाईपलाईन हडको,तपोवन हडको या चारही ठिकाणचे नागरिक म्हाडाची मार्च अखेर पर्यंतची थकबाकी भरण्यास चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी ज्या ठिकाणी म्हाडाचे अधिकारी,कर्मचारी वसुलीसाठी येत आहेत तेथील नागरिकांनी त्यांना भूभाडे भरून सहकार्य करण्याचे आवाहन म्हाडाचे अधिकारी गोरख कडूस यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top